Sunday, November 1, 2020

*☆✤┈┈┈•॥ सांजधारा ॥ •┈┈┈✤☆*

*☆✤┈┈┈•॥ सांजधारा ॥ •┈┈┈✤☆*
                *।। जय मल्हार ।।*
           ‼️ *ब्रम्हांडनायक* ‼️
  ‼️ *ॐ श्री स्वामी समर्थाय नमः*‼️
 *◆❂════▒((🕉️️))▒════❂◆*
          *तुझ्यापायी हे चित्त रमले,*
        *जीवन माझे हे सफल झाले*
         *भवपार तारुन ने तू आता*
         *तूच 'माता" अन् तूच "पिता"*
*☆✤┈┈┈┈••✦🕉️✦••┈┈┈┈✤☆*
 *। अशक्य ही शक्य करतील स्वामी ।*
 *◆❂════▒((🕉️️))▒════❂◆*
*। भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ।* 
*☆✤┈┈┈┈••✦🕉️✦••┈┈┈┈✤☆*
                ‼️ *सर्वस्व* ‼️
           ‼️ *श्री स्वामी समर्थ* ‼️
 *◆❂════▒((🕉️️))▒════❂◆*

Thursday, October 29, 2020

🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏

🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाने घरी करावयाचा लक्ष्मी-इंद्र-कुबेर-चंद्र- पूजनाचा कार्यक्रम-----
     शक्यतो हा कार्यक्रम घरीच करावा कारण वरील देवता या दिवशी पृथ्वीतलावर आशीर्वाद देण्या साठी येत असतात त्यांना अमृताचा म्हणजे दूध (बासुंदी) याचा नैवैद्य लागतो . 
    अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच   कोजागिरी पौर्णिमा ! या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक जागरण करतात त्यांना देव प्रसन्न होतात असा समज आहे.रात्री ही सर्व देवता पृथ्वी वर विचरण करतात कोण जागी आहे कोण पूजा करत आहे असे बघतात जे जागरण करून पूजा करतात त्यांच्यावर सर्व देवता प्रसन्न असतात त्यांना सुख समाधान व संपत्ती लाभते व झोपलेल्या व आळशी लोकांवर ती रागावते 🙏
कोजागिरी म्हणजे को जागरती म्हणजे कोण जगतोय या वरून कोजागिरी नाव पडले🙏
 *पूजाविधी मांडणी*
     मांडणी करतांना एका पाटावर किंवा चौरंगावर 
1) गणपती चे प्रतीक म्हणून नागवेल चे जोड पानावर एक सुपारी
2) लक्ष्मी चे प्रतीक म्हणून जोड पानावर एक सुपारी
3) कुबेर चे प्रतीक म्हणून जोड पानावर एक सुपारी
4) तांदुळाच्या राशीवर भरलेला तांब्याचा तांब्या त्यात आंब्याचा डगळा इंद्राचे प्रतीक म्हणून घ्यावा
5) चंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल बनवावा
6) 12।30 ला पूजेच्या पाटासमोर दुधाचे भांडे ठेऊन सर्व देवांना हळद कुंकू, पांढरी फुलं, अक्षदा, अष्टगन्ध वाहून पूजा करावी .दुपारीच तुळशीपत्र तोडून ठेवावे.नैवेद्यात तुळशीपत्र टाकावे.नैवैद्य दाखवावा व प्रार्थना म्हणावी-------
      *प्रार्थना*
*ऋण रोगादी दारिद्र्यम अपमृत्यु भय ।शोक मनस्ताप नाशयंतु मम् सर्वदा।।*
      पूजा 12 वाजेच्या आत मांडून ठेवावी. 12 ते 12।30 या काळात लक्ष्मी प्राप्ती ची सेवा करावी त्यात 
   1) श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप,   2) श्री लक्ष्मी गायत्री मंत्र,   3) श्री विष्णू गायत्री मंत्र,  4) कुबेर मंत्र प्रत्येक एक माळ जप करावा तसेच 5) 16 वेळा श्री सूक्त, 6) श्री व्यकटेश स्तोत्र 1वेळा,  7) गीतेचा 15 वा अद्ध्याय अशी ही सेवा करायची आहे  🙏🙏👆

Friday, October 16, 2020

Australia is an expensive country, but the civic services are of the best standards.

Australia is an expensive country, but the civic services are of the best standards. 

Must read this

Last year during Christmas, a *family from Kanpur* was on a holiday in Australia.

Apart from his Wife and two children, this man from Kanpur was also accompanied by his Father. 

They were traveling on one of the freeways.

This Indian family was in their car and was followed by a local Aussie lady, driving at a safe distance.

Suddenly the Aussie lady saw a head of an old Man coming out of the window and *vomiting blood*....

She took a quick action by calling 000 for help.

In no time, there appeared an *Air Ambulance Helicopter.*

The well trained staff quickly shifted that old Man on the stretcher.   Oxygen supply started.  Doctors started examining him....

Sometime later, the old Man was declared safe and fit to travel again. 

Kudos to quick help and well done the Aussie lady 👍

For these services, our Kanpur man had to pay A$ 3,500.

With these unplanned heavy financial charges, the Kanpur man was in shock and he blasted his Father....

*"Paan kha kar khidki ke bahar pichkari maarne ki kya zaroorat thhi?"*

* नवरात्री उपवासाचा आहार *

*नवरात्री उपवासाचा आहार !*


१६ तारखेला अधिक मास संपून १७ तारखेपासून घट स्थापना होऊन नवरात्रीचा प्रारंभ होत आहे. 
👍  *या वेळेस नवरात्री आठ दिवसाची आहे, कारण नवमी व दसरा एकत्र आलेला आहे.*
भगवती आदिशक्तीची पुजा संपुर्ण देशात आपापल्या रितीप्रमाणे मांडली जाते. कित्येक लोक नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करुन आपली भक्ती व्यक्त करतात. आपण उपवास तर करतो आणि मग दिवसभर काय खातो तर कुठे साबुदाणा, शेंगदाणा, बटाटा, रताळी असे पिष्टमय पदार्थ. बाद करा हे सर्व पदार्थ आपल्या आहारातून !   

या नवरात्रीला आपल्याला खायचे आहे, भरपुर फळे, दुध, ताक आणि राजगीरा.
खाण्या पिण्याचा दिनक्रम योग्य तरहेने होण्यासाठी दहा दिवसाचा एक वेळापत्रक बनवून घेऊ ...
👍 दररोज सकाळी उठल्याबरोबर १ ग्लास उकळुन कोमट केलेले पाणी प्यावे.
👍 नंतर बिना साखरेचे विलायची युक्त दुध किंवा कमी साखरेचा चहा, काढा, ग्रीन टी काहीही.
👍 रोज नाश्ता करण्यापुर्वी धणे पाणी, ओवा पाणी किंवा जिरा पाणी अवश्य घ्यावे. हयामुळे पचन व्यवस्थित होते, व शरीरातील विषाक्त द्रव्यांचे ज्वलन होण्यास मदत होते. 
👍 फळे नेहमी ताजी घ्यावीत व फ्रिजमधली गार नको . तसेच फळावंर काळया मि-याची पुड आठवणीने टाकावी. 
👍 दिवस भरात अधुन मधुन बिना साखरेचे लिंबु पाणी प्यावे.
👍 दररोज रात्री झोपताना १ ग्लास गरम गरम पाणी फुंकुन फुंकुन प्यावे.
👍  *धणे पाणी ,ओवा पाणी किंवा जिरा पाणी बनविण्याची कृती* :-- दोन चमचे अर्धवट कुटलेले धणे किंवा ओवा किंवा जिरे घ्यावे. एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजू दयावे. व सकाळी चांगले मसळून - गाळून प्यावे.

*दिनांकः १७ ऑक्टोबर*
*सकाळी  ७ ते ११* १०-१५ खिसमिस व ५ बदाम 
*दुपारी  १२ ते २* २ संत्री/मोसंबी
*दुपारी २ ते ५*   १-२ ग्लास ताक
*संध्या ६ ते ८* राजगीरा पोळी भेंडीची भाजी     

*दिनांकः १८ ऑक्टोबर*
*सकाळी ७ ते ११*                आक्रोड १-२ व १-२ जर्दाळू
*दुपारी  १२ ते २* २ मोसंबी
*दुपारी  २ ते ५*   ताक
*संध्या ६ ते ८* राजगीरा थालीपिठ व कढी


*दिनांकः १९ ऑक्टोबर*
*सकाळी ७ ते ११* १-२ उकडलेला बटाटा   
*दुपारी  १२ ते २* अननस
*दुपारी  २ ते ५* ताक   
*संध्या ६ ते ८* काकडी कोशिंबीर व राजगीरा चपाती

*दिनांकः २० ऑक्टोबर*
*सकाळी ७ ते ११* ६ बदाम व २० चारोळी
*दुपारी  १२ ते २* टरबुज
*दुपारी  २ ते ५* ताक   
*संध्या ६ ते ८* राजगिरा लाही व दुध

*दिनांकः २१ ऑक्टोबर*
*सकाळी ७ ते ११* ४ खारीक व ५ बदाम
*दुपारी  १२ ते २* पपई
*दुपारी  २ ते ५* ताक   
*संध्या ६ ते ८* राजगीरा चपाती व गोल भोपळयाची भाजी


*दिनांकः २२ ऑक्टोबर*
*सकाळी ७ ते ११* २० मनुक्के  ४ अंजीर
*दुपारी  १२ ते २* डाळिंब
*दुपारी  २ ते ५* नारळ पाणी   
*संध्या ६ ते ८* २ ते ४ राजगीरा लाडू

*दिनांकः २३ ऑक्टोबर*
*सकाळी ७ ते ११* भाजलेले शेंगदाणे व गुळ
*दुपारी  १२ ते २* सफरचंद/किवी हे फळ
*दुपारी  २ ते ५* नारळ पाणी    
*संध्या ६ ते ८* राजगीरा चपाती व राजगीरापानांची भाजी किंवा कढी

*दिनांकः २४ ऑक्टोबर*
*सकाळी ७ ते ११* कॉफी व राजगीरा बिस्कीट 
*दुपारी  १२ ते २* कोथीबिंरीचा रस/ताक
*दुपारी  २ ते ५* नारळ पाणी/ताक  
*संध्या ६ ते ८* राजगीरा पिठाचा उपमा

*दसरा*
*दिनांकः २५ ऑक्टोबर*


अशा प्रकारे नवरात्रीचे नऊ दिवस हा आहारक्रम आपणास ठेवायचा आहे, जेणे करुन नक्कीच आई भवानी आपणास पावेल. 
👍  हा आहार घेताना लक्षात घ्या, रोज वेगळया पदार्थांची निवड आपण केली आहे, त्यामुळे सर्व प्रकारची जीवनसत्वे आपल्या शरीरात जातील व आपणास कुठल्याही प्रकारे उपवासाने अशक्तपणा येणार नाही.
👍  राजगीरा हा पदार्थ मात्र दररोज वापरायचा आहे, कारण राजगीरा हे धान्य पचावयास खुप हल्के आहे, याने पोट तर भरते मात्र वजन वाढत नाही शिवाय या मध्ये भरपूर मात्रेत कॅल्शियमचे प्रमाण आहे. राजगीरा धान्य बाजारातून आणून स्वच्छ करुन घरी त्याच्या लाहया फोडाव्यात . गरम झालेल्या कडाई मध्ये थोडे थोडे राजगीरा टाकत जावे व हलवित राहावे, क्षणार्धात लाहया फुटतात. तसे तसे त्या बाजुला काढा हयाच लाहया मिक्सर मधून काढल्यास पीठ तयार होते याचीच आपण पोळी करुन घ्यावयाची आहे. (अवघड वाटत असेल तर बाजारात तयार राजगीरा लाह्या व पीठ मिळते ते वापरावे.)  यात शाबूदाना वा भगरीचे पीठ कालविण्याची आवश्यकता नाही 
👍 कुठल्याही प्रकारे साखरेचा वापर करु नका. 

तर आशा आहे तुम्हाला हा उपवासाचा वेळापत्रक आवडेल व तुम्ही भक्तीभावाने याचा अवलंब कराल तर मग बोला अंबे आईचा उदो उदो !!! जय माता दी।
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Wednesday, October 14, 2020

*उपयुक्त माहिती...*

*उपयुक्त माहिती...*

*१) देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये ?*

*उत्तर :-* ती यमाची मृत्यू ची दिशा आहे . यमाची पुजा केली जात नाही. फक्त दिवाळीत यम व्दितीयाला यमाचे पुजन केले जाते तेव्हा दक्षिणेला दिवा लावला जातो.

 *२) स्त्रियांनी केव्हाही तुळस का तोडू नये?*

*उत्तर :-* ही सौभाग्य देणारी आहे म्हणून.

 *३) देव-देवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी का काढावी ?*

*उत्तर :-* ब्रह्मरंध्राकडे निर्गुण ईश्वरी उर्जा आकृष्ट होते व ती ग्रहण करण्यासाठी टोपी काढावी .

*४) शिवपिंडीला अर्धीच प्रदक्षिणा का घालावी.*

*उत्तर :-* शिवसुत्र आहे महादेवाचे. रद्रगण, पितृगण,लिंगाच्या टोकाला तीर्थ प्रसादासाठी बसलेले असतात .त्याना प्रदक्षिणा होईल म्हणून.

*५) एकाच घरात दोन शिवलिंगे, दोन शाळीग्राम, दोन सुर्यकांत, दोन चक्रांक, तीन देवी, गणपती व दोन शंख पूजेस का पुजू नयेत ?*

*उत्तर :-* प्रत्येक गोष्टीत एक तत्व असते. आई बाप दोन होऊ शकत नाही एकच असतात अव्दैताची पुजा करतात, व्दैताची पुजा केली जात नाही म्हणून.

 *६) गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत का जपू नये ?*

*उत्तर :-* हा मंत्रराज आहे, ज्या मंत्राना बीज असतात, ते मंत्र सोवळ्यातच आसनावर करायचे असतात. कारण चित्ताची एकाग्रता महत्वाची असते. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत जपताना ती एकाग्रता साधत नाही व शरीर दोष येतो अंतर्मुखता साधत नाही. त्यामुळे मंत्रजपाचे फल मिळत नाही म्हणून ....

*७) शाळीग्राम पूजावयाचे ते सम पूजावेत. मात्र समांमध्ये दोन का पुजू नयेत ?*

*उत्तर :-* शाळीग्राम हा स्वयंभू आहे. हे विष्णूचे प्रतिक आहे व दोन पुजले तर कर्त्याला उद्वेग, कलह प्राप्त होतो म्हणून ..

*८) निरंजनात तुप व तेल कधीही एकत्र का घालू नये ?*

*उत्तर :-* तूप हे सत्व तत्व व निर्गुण आहे व तेल हे रज तत्व व सगुण आहे . म्हणून हे दोन्ही एकत्र करता येत नाही . नाहीतर तम तत्व वाढेल . राक्षसी संकटे येतील म्हणून .

*९) देवदेवतांच्या मूर्तीची वा फोटोची तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर का करू नयेत ?*

*उत्तर:-* त्यांच्या तेजाच्या लहरी स्पंदने समोर फेकली जातात त्यामुळे शत्रुत्वाचा दोष येतो म्हणून ...

*१०) विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फुल मनुष्याने आपल्या मस्तकावर का ठेवू नये ?*

*उत्तर :-* फुले ही देवतांची पवित्रके आहेत. विष्णुतत्त्व व चैतन्य त्या फुलात येते ते शक्तीस्वरुप होते ही शक्ती आपणास सहन होत नाही म्हणून ..

*११) शिव मंदिरात झांज, सूर्य मंदिरात शंख व देवी मंदिरात बासरी का वाजवू नये ?*

*उत्तर :-* शिवाचा तमभाव आहे व झांजेतुन तमतत्वाचे स्वर उत्पन्न होतात त्यामुळे शिवास विरक्ती येते म्हणून...
सर्य हा अग्नी तत्त्वाचा आहे व शंखनादही अग्नीतत्वाचा आहे दोन्हीही शक्ति एकरूप झाल्यावर रज कणाचे घर्षण होते . सुक्ष्म ज्वाळाची निर्मिती होते व त्यामुळे दाह निर्माण होतो म्हणुन...
देवी मंदिरात बासरी ही नाद पोकळी निर्माण करतो . शक्तीतत्व ह्या नादात पोकळीत रहात नाही . ती हिरण्यगर्भा आहे . ती प्रसूति वैराग्य आहे ..

*१२) आपली जपमाळ व आसन कधीही दुस-यास वापरण्यास का देवू नये ?*

*उत्तर:-* त्यात आपल्या सेवेच्या सात्विक लहरीचे बंधन झालेले असते . ते दुस-यास दिल्यास त्याला ते मिळते व साधनेत त्या आसनावर आळस येतो.

*१३) देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध का लावावे.*

*उत्तर :-* हाताची पाची बोटे ही त्या त्या तत्वाशी निगडीत आहेत .
अंगठा -आत्मा/ 
तर्जनी -पितर/
मध्यमा-स्वतः/अनामिका -देव/करंगळी -ऋषी /
म्हणून देव बोटानेच देवाला गंध लावावे...

*१४) समईत नेहमी १, ३, ५, ७ अशा विषम वाती का असाव्यात सम का असू नयेत.*

*उत्तर :-* विषम तत्व हे तम आहे त्यामुळे आपल्याकडे येणारे तम ते विषम उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते म्हणून......

*१५) अंगावर फाटलेला कपडा कधीही का शिवू नये.*

*उत्तर :-* पितराना दोष लागतो म्हणून .

*१६) उंब-यावर बसून का शिंकू नये.*

*उत्तर :-* उबरा हा मुळात बसण्यासाठी नाही तेथे सर्वतिर्थे बसतात. तिथे घराची सात्विक ऊर्जा स्तंभित असते शिंकेने तिला व्यास येतो त्यामुळे अपशकुन घडतो म्हणून..... घडल्यास पाणी शिंपडावे......

*१७) निजलेल्या माणसास का ओलांडून जावू नये.*

*उत्तर :-* झोपलेला शव असतो म्हणजे शिव असतो म्हणून ..

 *१८) मांजराना प्रेत ओलांडून का देवू नये.*

*उत्तर :-* प्रेत प्रेतच राहते म्हजे पिशाच्च योनित जाते त्याला मोक्ष प्राप्ती होत नाही म्हणून ..

*१९) रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीद का आणू नयेत किंवा दुस-यास का देवू नयेत ?*

*उत्तर :-* याच्यात करणीतत्व आहेत. आकर्षण क्रिया पटकन होते व बळीतत्त्व आहे म्हणून ....

 *२०) सायंकाळी केर का काढु नये?*

*उत्तर :-* लक्ष्मीला आवडत नाही .
लक्ष्मी हळूहळू निघून जाते व अलक्ष्मीला आवडते...

 *२१) रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार का करावा.*

*उत्तर :-* शव= शिव म्हणून नमस्कार करावा....

*२२) कुणाच्या घरातून परत निघताना जातो असे न म्हणता येतो असे का म्हणावे ?*

*उत्तर :-* येणे घडते नाहीतर कायमचे जाणे होते...

*२३) एका हाताने देवाला नमस्कार का करू नये.* 

*उत्तर :-* दश इन्द्रियाचा नमस्कार मह्त्वाचा असतो . पंचतत्त्वाचा नाही ...

*सर्वांना ही माहिती द्या..*

🌹 श्री स्वामी समर्थ 🌹

*नवरात्रीत सिद्ध करा नवार्णव मंत्र.*

*नवरात्रीत सिद्ध करा नवार्णव मंत्र.*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

*!! नवार्णव मंत्राचा अर्थ..!!*

माता भगवती जगत जननी आहे, दुर्गा आहे. मातेच्या साधनेत नवार्ण मंत्राला महामंत्राचे स्थान आहे. 
नवार्ण = नऊ अक्षराचा मंत्र. 
या मंत्रामध्ये नवग्रहांना नियंत्रित करण्याची शक्ती आहे. हा महामंत्र इतर साऱ्या मंत्रापेक्षा व स्तोत्रापेक्षा श्रेष्ठ आहे.

भगवती दुर्गेचे प्रामुख्याने तीन रूपे आहेत, 
महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. 
या तिन्ही रूपांची साधना करण्यासाठीचा हा अति प्रभावी असा बीज मंत्र आहे. त्याच बरोबर मातेच्या नऊ रूपांचा हा एक संयुक्त मंत्र आहे, ज्याने नवग्रहांना शांत केले जाते.

॥ ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे ॥ 

नऊ अक्षराच्या या अति अद्भुत नवार्ण मंत्रामध्ये दुर्गा देवीच्या नऊ शक्ती सामावलेल्या आहेत, ज्यांचा संबंध नवग्रहांशी आहे.

ऐं = महासरस्वती चा बीज मंत्र आहे,
ह्रीं = महालक्ष्मीचा बीज मंत्र आहे.
क्लीं = महाकालीचा बीज मंत्र आहे.

याच बरोबर खाली दिलेल्या नवदुर्गेच्या मंत्राप्रमाणे

प्रथमं शैलपुत्रीच, द्वितीयं ब्रम्हचारिणी |
तृतीयं चन्द्रघंटेती, कुश्मांडेती चतुर्थकम ||
पंचमं स्कन्दमातेती, षष्ठं कात्यायनितीच |
सप्तमं कालरात्रीति, महागौरीती चाष्टमम ||
नवमं सिधीदात्रीच, नवदुर्गा प्रकीर्तिता |
उक्तान्येतानि नामानि ब्रम्हनैव महात्मना ||

ऐं = प्रथम =शैलपुत्री = सूर्य
ह्रीं = द्वितीय = ब्रम्हचारिणी = चंद्र
क्लीं = त्रितीय = चन्द्रघंटा = मंगळ
चा = चतुर्थ = कुश्मांडा = बुध
मुं = पंचम = स्कन्दमाता = बृहस्पती
डा = षष्ठं = कात्यायनि = शुक्र
यै = सप्तमं = कालरात्री = शनि
वि = अष्टमं = महागौरी = राहू
च्चै = नवमं = सिधीदात्री = केतू

नवार्ण मंत्राचे प्रथम बीज “ऐं” पासून दुर्गा देवीच्या पहिल्या शक्ती “माता शैलपुत्री” ची उपासना केली जाते, ज्यात “सुर्य ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.

नवार्ण मंत्राचे द्वितीय बीज “ह्रीं” पासून दुर्गा देवीच्या द्वितीय शक्ती “माता ब्रह्मचारिणी” ची उपासना केली जाते, ज्यात “चंद्र ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.

नवार्ण मंत्राचे त्रितीय बीज “क्लीं” पासून दुर्गा देवीच्या त्रितीय शक्ती “माता चंद्रघंटा” ची उपासना केली जाते, ज्यात “मंगळ ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.

नवार्ण मंत्राचे चतुर्थ बीज “चा” पासून दुर्गा देवीच्या चतुर्थ शक्ती “माता कुश्माण्डा” ची उपासना केली जाते, ज्यात “बुध ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.

नवार्ण मंत्राचे पंचम बीज “मुं” पासून दुर्गा देवीच्या पंचम शक्ती “माता स्कंदमाता” ची उपासना केली जाते, ज्यात “बृहस्पती ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.

नवार्ण मंत्राचे षष्ठ बीज “डा” पासून दुर्गा देवीच्या षष्ठ शक्ती “माता कात्यायनी” ची उपासना केली जाते, ज्यात “शुक्र ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.

नवार्ण मंत्राचे सप्तम बीजयै” पासून दुर्गा देवीच्या सप्तम शक्ती “माता कालरात्री” ची उपासना केली जाते, ज्यात “शनि ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.

नवार्ण मंत्राचे अष्टम बीज “वि” पासून दुर्गा देवीच्या अष्टम शक्ती “माता महागौरी” ची उपासना केली जाते, ज्यात “राहू ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.

नवार्ण मंत्राचे नवम बीज “च्चै” पासून दुर्गा देवीच्या नवम  शक्ती “माता सिद्धीदात्री” ची उपासना केली जाते, ज्यात “केतू ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.
या त्रिशक्ती जगदम्बा सर्वार्थ सिद्धि मंत्रात एक अशी अलौकिक ऊर्जा समाहित आहे, ज्याची तुलना अन्य कोणत्याही मंत्राशी करू शकत नाही. या मंत्रात हजारों गायत्री मंत्राची ऊर्जा समाहित आहे. हा मंत्र मारण, मोहन, वशीकरण, स्तम्भन तथा उच्चाटन आदि क्षत्रात पूर्ण प्रभावक आणि साऱ्या कालकुचक्रांचा नाशक आहे.

१) मारण = क्रोध, मद, लोभ आदिचा नाश करणे. यामुळे आपल्या शत्रूचा पराजय करू शकतो. या मंत्राच्या जपणे शत्रुपक्षाची शक्ति क्षीण केली जाते.

२) मोहन = आपल्या इष्ट माता भगवती ला प्रसन्न करणे.

३) वशीकरण = या मंत्राने आपल्या मनाला पूर्णपणे वश केले जाते, आपल्या मनावर अधिकार प्राप्त केला जातो.

४) स्तम्भन = या मंत्राच्या के माध्यमाने आपल्या इन्द्रियांच्या विषय-विकारांना थांबवले जावू शकते.

५) उच्चाटन = या मंत्राद्वारे मोह, ममता, लिप्तता आदि त्याग करून साधक मोक्ष प्राप्ति साठी प्रयासरत राहतो आणि स्वतःला भौतिक जगता पासून दूर करून आध्यात्मिक जगताशी नाते जोडले जाते.

या महामंत्राच्या जपात उपर्युक्त भाव, साधकाच्या प्रथम चरणाची पात्रता प्राप्त करण्या पर्यंतच राहिली पाहिजे. त्याच्या पुढे भाव क्षेत्रात अन्य लाभ घेण्यासाठी, या महामंत्राचा लाभ, पूर्ण पात्रताप्राप्त सद्गुरु च्या मार्गदर्शनानेच प्राप्त केला जावू शकतो.

या त्रिशक्ति जगदंबा सर्वार्थ सिद्धि मंत्राचा प्रभाव साधकांसाठी पारसमणी सारखा कार्य करतो. साधक जेवढा या मंत्राच्या उर्जेने एकाकार होत जातो, तेवढा तो प्रकृतिसत्तेशी एकाकार होत जातो. या मंत्राचा उपयोग करून साधक आपल्या आध्यात्मिक जीवनात पूर्णता प्राप्त करू शकतो.⁠⁠
*जय अंबे जगदंबा*
🚩🚩🚩🕉🚩🚩🚩

माहिती संकलनः श्री दीपक कुळकर्णी.

Sunday, October 11, 2020

National Girl child Day✨✨✨✨

आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा 2020*

🌹🌹 *शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) मुंबई आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा 2020*

*निकाल-खुला गट*

(एकूण सहभागी स्पर्धक १४७)

प्रथम -   रंजना राजेंद्र ढवळे  
            कोरोना एक राष्ट्रीय आपत्ती
            न्यू पनवेल रायगड

द्वितीय - सुजाता हनमघर - 
            ऑनलाईन शिक्षण फायदे    
            तोटे-सायन मुंबई

तृतीय - रवी पाटील - भ्रष्टाचार 
           निर्मूलन काळाची गरज
           डोंबिवली ठाणे


*उत्तेजनार्थ पारितोषिके*

1   अण्णा अभंग - ऑनलाईन  
      शिक्षणाचे फायसे तोटे-
      संगमनेर अहमदनगर

2     निमिषा जाधव - संविधान 
       वाचवा...देश वाचवा
       कणकवली सिधुदुर्ग

3    ईश्वर  रामदास महाजन
      ऑनलाईन शिक्षण फायदे तोटे
      अमळनेर

4    ज्ञानेश्वरी धांडे
      भ्रष्टाचार निर्मुलन काळाची गरज
      खिरोदा जळगाव


####################

*गट इयत्ता 9 वी ते 12 वी निकाल*

(एकूण सहभागी स्पर्धक २४१)

प्रथम -   प्रेरणा प्रकाश परदेशी
            वृक्षसंवर्धन काळाची गरज
            मालेगाव नाशिक

द्वितीय - वैष्णव कैलास वाढेकर
            कोरोनामुळे बदललेलं जग
            हसनाबाद-जालना

तृतीय -  लक्षणा बाळकृष्ण कदम
            माझी आवड विज्ञान की     
            कला
            मानखुर्द मुंबई


*उत्तेजनार्थ  पारितोषिक*

1    सुवर्णा किरण महाजन
      ऑनलाइन शिक्षणाचे परिणाम
      जळगाव

2    आर्या गजेंद्र गडकर
       वृक्षसंवर्धन काळाची गरज
       डोंबिवली ठाणे

3     वैष्णवी हेमंत बावस्कर
       कोरोनमुळे बदललेलं जग
       पनवेल रायगड

4     प्रतीक साहेबराव सुडके
       वृक्षसंवर्धन काळाची गरज
       नाशिक

5     साक्षी गुलाब गवळी
       ऑनलाईन शिक्षणाचे परिणाम
        निफाड


6      शोभा निकोलस बारला
        कोरोनमुळे बदललेलं जग
        वाडा डहाणू

7      कोमल आत्माराम गोरुले
        वृक्षसंवर्धन काळाची गरज
        संगमेश्वर रत्नागिरी

🌹🌹🌹 निबंध स्पर्धेत सहभागी सर्वांना धन्यवाद,
          सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन🌹🌹🌹
     
                *श्री गणेश हिरवे*
                *९९२०५८१८७८*
                   *स्पर्धा प्रमुख*
         *शिक्षक लोकशाही आघाडी*
                  *TDF, मुंबई*
       

टीप : सर्व स्पर्धकांना सहभागी झाल्याबद्दल आकर्षक प्रमाणपत्र मेल वा व्हाटस् अप द्वारे दिवाळीनंतर पाठविण्यात येईल तर विजेत्यां चा  लॉक डाऊन उठल्यावर कार्यक्रम आयोजित करून बक्षिसे वितरित करून सन्मान करण्यात येईल.

Friday, October 9, 2020

किंमती रत्नांची भेट

आज अधिक मासाचा उत्तरार्ध सुरू होत आहे. त्यानिमित्त आपणांसर्वांना  सात किंमती रत्नांची भेट पाठवित आहे.
 *🍁💥   पहिले रत्न    💥🍁*
  💫  *माफी*  💫
तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलले, तरी ते मनाला लावून न घेता, मोठ्या मनाने 'माफ' करा.
*🍀💥 दुसरे रत्न  💥🍀*
  💫  *उपकार*  💫
दुसऱ्यावर केलेले उपकार विसरा. फळाची अपेक्षा करु नका. 'निःस्वार्थ' भावना ठेवा.
*‼️🎄तिसरे रत्न 🎄‼️*
  💫  *विश्वास*  💫
 नेहमी 'स्वकष्ट' आणि कर्मावर' अतूट विश्वास ठेवा.  हीच तुमच्या यशाची पावती असेल.
*💥  चौथे रत्न*   💥
 💫  *नातं*  💫
समोरच्याच्या मनाची काळजी आपण आपल्या मनापेक्षा जास्त घेतल्यावर जे निर्माण होत ते नातं. त्या नात्याला जपा, नात्यांना तडा जावू देवू नका.
*💥  पाचवे रत्न*   💥
💫  *दान*  💫
नेहमी चांगल्या कार्यासाठी सढळ हाताने दान करा. दान केल्याने धन कमी होत नाही, उलट दान केल्याने मान व समाधान मिळते. आपले मनच आपल्याला दानशूर ही पदवी बहाल करतं.
 *💥  सहावे रत्न*   💥
  💫  *आरोग्य*  💫
दररोज व्यायाम करा, योगासने करा,चालणे ठेवा आणि आपले जीवन निरोगी ठेवा.
*💥   सातवे रत्न*   💥
  💫   *वैराग्य*  💫
नेहमी लक्षात ठेवा की, 'जन्म' आणि 'मरण' कधीच कुणालाच चुकलेले नाही. 'जन्म'  घेतला म्हणजे  'मृत्यु' अटळ आहे.  वर्तमानात जगा. कोणत्याही गोष्टींचे दुःख कुरवाळत  बसू  नका. 

*'एकंदरीत जीवन खूप सुंदर आहे,  आनंदाने जगा..*.🌸🙏🏻🌸  🌹
*माणूस जसा बदलत चालला आहे, तसा निसर्ग देखील बदलत चालला आहे.*
*निसर्गाची ताकद किती आहे बघा. निसर्गातील एक विषाणू सांगून गेला, पैसा,संपत्ती,गाडी,बंगला,सोने, श्रीमंती याही पेक्षा आपला जीव महत्त्वाचा आहे.* 🌻
 🌹👏🏽🌹👏🏽🌹👏🏽🌹

मनुष्य

कमी शिक्षण आहे - नको
पगार कमी आहे - नको
खेड्यात राहतो - नको
स्वतःचे घर नाही -नको 
घरात सासू सासरे आहेत - नको
शेत नाही -.नको 
शेती करतो - नको
धंदा करतो -.नको
फार लांब राहतो - नको
काळा आहे - नको
टक्कल आहे - नको
बुटका आहे - नको
फार उंच आहे - नको
चष्मा आहे - नका
वयात जास्त अंतर आहे - नको
तो जिथे राहतो तो एरिया बरोबर नाही-नको
एक नाडी आहे - नको
मंगळ आहे - नको
नक्षत्र दोष आहे - नको
मैत्रीदोष आहे - नको
कुंडली जमत नाही - नको
*मग लग्न कधी करणार*
मसनात गेल्यावर
संसार कुणाबरोबर करणार ?
भूत,प्रेत,पिशाचाबरोबर
*आई/ बाप कधी होणार*
मी आई/बाप होणारच नाही
सासू/सासरे कधी होणार?
होणारच नाही
आजी/अजोबा कधी होणार?
पुढच्या जन्मात.
व्यर्थच आहे यांचा जन्म.

पुढच्या जन्मात मनुष्य देह मिळेल  की नाही माहिती नाही ? .

कारण स्वर्गातून भगवंत  नेहमी तथास्तु  म्हणत असतो. 
आणि आपण सगळ्याच गोष्टी त नकारत्मका ठेवून या जन्मतल   सगळ्या अर्थाच संपवून टाकतोय.

*आपल्या मुलाचा / मुलीचा किंवा स्वतःचा विचार करावाच,
पण त्या
 सोबातच आपल्याला भगवंताने पुढचा जन्म मनुष्याचा द्यावा की नाही?
 हा विचार करायच्या आधी त्याने आपल्याला  दिलेला हा जन्म सार्थ करून दाखवायला  लागेल ...........

Friday, October 2, 2020

*सुखी व्हायचं आहे का ? मग...**"कर्मा रिटर्न्स" हे विसरू नका !*

*सुखी व्हायचं आहे का ? मग...*
*"कर्मा रिटर्न्स" हे विसरू नका !*

*जे पेराल तेच उगवेल*
*जे द्याल तेच रिटर्न घ्याल,,,*

एका सुंदर शहरात छान बंगल्याची एक कॉलनी होती. त्या कॉलनीत एक बंगला बरेच दिवस रिकामा असतो. त्यामुळे शेजारच्या बंगल्यातील मंडळी त्यांच्या बागेतला कचरा रात्री हळूच या बंद असलेल्या बंगल्याच्या आवारात टाकून देत असत. त्यामुळे तिथं कचऱ्याचा भला मोठा ढीग साचलेला. 
अशातच एक दिवस त्या बंद बंगल्यात एक तरुण जोडपं राहायला येत. कंपाउंड दार उघडून ते आत येताच समोर हा कचऱ्याचा ढीग दिसतो. ती चिडते, वैतागते. हे असं कुणी केलं असेल यावर तडफड व्यक्त करते. तो मात्र शांत असतो. तिला "आधी आत तर जाऊया" असं हसून म्हणत तिला आत घेऊन येतो. येतानाच बाहेरून जेवून आल्याने आता हाताशी वेळ असतो. तर तो तिला म्हणतो, "गॅलरी त्यातल्या त्यात स्वच्छ दिसतेय तर तू  तिथं थोडा आराम कर" असं म्हणून तिला तिथं बसवून हा पठया हातात झाडू घेऊन आधी पूर्ण घर साफ करतो. नंतर बागेत येतो. तिथला कचऱ्याचा ढीग नीट एका कोपऱ्यात नेतो. बागकामासाठी लागणारी हत्यारे तिथेच बागेत एका छोट्या कपाटात असतात. त्यातून तो कुदळ फावडे घेऊन एक छोटा खड्डा तयार करतो. त्यात हा कचरा टाकून वरती थोडी माती व पाणी शिंपडून खड्डा बंद करतो. 
नंतर पाईप घेऊन त्याने पूर्ण बागेच्या परिसरात मस्त पाणी मारतो. मरगळलेली ती झाडे आता एकदम तरारून येतात. जमिनीवरची हिरवळ देखील जणू खुश होऊन डोलू लागते. एक प्रकारचं चैतन्य तिथं अवतरत. अन त्याच्या लक्षात येतं की बागेत मस्त आंब्याचे, चिकूचे, पेरूचे झाडे आहेत. त्या झाडाला मग तो थोडं पाणी टाकून ठेवतो. 
*
हे करता करता संध्याकाळ होते. तोही थकून गेलेला असतो. तोवर ती हि आतून बाहेर येते. म्हणते, "मी आतलं सामान बऱ्यापैकी लावलं आहे. मात्र आता किचनचा कंटाळा आलाय रे"
तो म्हणतो, "हरकत नाही, आपण बाहेर जाऊया. थोडं फिरणं पण होईल अन येताना खाऊन येऊ"
त्याप्रमाणे दोघे तयार होऊन बाहेर जातात. 
त्या दरम्यान शेजारच्या त्या बंगल्यातले लोक तोवर हे सगळं पाहत असतात. मात्र रोजच्या सवयीने रात्रीच्या अंधारात ते स्वतःचा कचरा या स्वच्छ केलेल्या बंगल्यात टाकतात. अन दार बंद करून आत बसतात. 
हे तरुण जोडपं जेव्हा फिरून खाऊन घरी येत तर दिसत की पुन्हा शेजारच्यांनी कचरा टाकला आहे. ती आता मात्र खवळते. "मी बघतेच त्यांच्याकडे" असं म्हणून ती शेजारी जायला निघणार इतक्यात तो तिला थांबवतो अन हसून म्हणतो, "तू आत जा. बाकी सोड माझ्यावर"
असं म्हणून तिला आत पाठवून तो पुन्हा खराटा घेऊन तो कचरा गोळा करून त्या दुपारी केलेल्या खड्ड्यात टाकून पाणी टाकून ठेवतो. 
*
असे रोजच होऊ लागते. शेजारचे अंधाऱ्या रात्री कचरा टाकून जात अन हा खराटा घेऊन तो खड्ड्यात टाकून ठेवत असे. हळूहळू त्या खड्ड्यातील कचऱ्याचे मस्त सेंद्रिय खत तयार होते. ते खत तो बागेतल्या फळझाडांना टाकत राहतो. त्यामुळे लवकरच त्या झाडाला मस्त फळे येतात. 
अन त्या दिवशी तो एक धमाल निर्णय घेतो. 
नेहमीप्रमाणे रात्री शेजारचे कचरा टाकून जातात. तो हा कचरा गोळा करून शोष खड्ड्यात टाकतो. अन सकाळी उठल्यावर त्या बागेतली झकास अशी तयार झालेली फळे तोडून एका टोपलीत भरून ती टोपली घेऊन शेजारच्या घरी जातो. बेल वाजवतो. आतून तिथली मंडळी पिप होलमधून पाहतात तर हा तरुण दिसतो. ते शेजारी गडबडतात की आता भांडायला आला की काय ? असं म्हणून ते भांडणाच्या तयारीत दार उघडतात तर समोर हा तरुण हसतमुखाने हातातली फळाची टोपली त्या शेजार्याला देतो. 
शेजारी चकित होतो. शेवटी ओशाळून तोच म्हणतो की, "आम्ही रोज कचरा टाकत होतो तरी तुम्ही भांडण करत नाहीत तर उलट आम्हालाच फळे द्यायला आलात. हे कसे काय?"
तर तो तरुण म्हणाला, 
*ज्याच्याकडे जे असते ते तो देत असतो.*
तुमच्याकडे कचरा होता तो तुम्ही दिला. माझ्याकडे फळे होती ती मी दिली, 
उलट यामध्ये पण तुमचेच आभार मानेल की तुम्ही दिलेल्या कचऱ्यामुळे माझ्या झाडाला लवकर फळे आली. थँक्स"
असं बोलून शांतपणे तो तरुण निघून येतो. 
*
डीडी क्लास : मित्रमैत्रिणींनो, एक नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला सुखी व्हायच असेल तर एकच गोष्ट विसरू नका. कर्मा रिटर्न्स हे तर असतंच. तुम्ही चांगले केले तर त्याचे फळ चांगले मिळणार, मात्र त्याचवेळी समोरच्याने वाईट कृत्य केले तरी त्याला माफ करून त्याच कृत्यातून पॉजिटीव्ह असे काहीतरी काय करता येईल हे पहा. (जसे त्या तरुणाने कचऱ्याचे खत केले) मग तुमच्या मनाला शांतता लाभेल. चिडचिड होणार नाही. 
*"अमुकने माझ्या आयुष्याचे वाट्टोळे केले"*
असं काहीजण म्हणतात. पण त्यात तथ्य नसते. कुणीच कुणाचे असे वाट्टोळे करत नसतो तर तुम्हीच काहीतरी वाईट कर्म केलेले असते तर तेच रिटर्न तुमच्याकडे आलेले असते. हे कळले तर जीवन सुखकर होईल. 
*कर्म हे असे एक हॉटेल आहे,*
*जिथे ऑर्डर द्यावी लागत नाही.*
*तिथे तुम्हाला तेच मिळते*
*जे तुम्ही शिजवलेले असते.*

कुठेतरी मस्त ऐकण्यात आलेलं शेर  शेवटी सांगतो अन थांबतो...
 
*"दाग तेरे दामन के धुले न धुले* 
*नेकी तेरी कही तुले न तुले* 
*मांग ले गलतियो कि माफी*
*कभी तो खुदसे हि* 
*क्या पता ये आँखे*
*कल खुले न खुले... !!*

✒🎯✒🎯✒🎯