🙏🏻नम्रविनंती🙏🏻
नमस्कार मित्र मैत्रिणींनो, नातेवाईक 🙏🏻यांना 6-7 महिने आपण एका दुःखद स्वप्नातून जात आहोत आणि ते कधी संपणार हे माहीत नाही.
या काळात अनेक लोक देशोधडीला लागले.
अनेकांचे संसार मोडले
अनेकांनी त्यांचे आप्तेष्ट गमावले
या दुःखाची भरपाई होऊ शकत नाही.
मात्र लहानपणापासून स्वप्नं बघून, अभ्यास करून कष्टाने मिळवलेली नोकरी जाणं असो की जवळपासची सगळी पूंजी पणाला लावून नुकताच उभारलेला व्यवसाय असो.
👍🏻
डोळ्यांदेखत होत्याचं नव्हतं झालं काही जणांच्या आयुष्यात😔
ज्यांना जायचे होते ते गेले आहेत🙏🏻
जे मागे राहिले त्यांना उभे रहायचे आहे🙏🏻 जगायचे आहे🙏🏻उरलेल्यांना पोसायचं आहे.🙏🏻
अनेक ग्रॅज्युएट.🙏🏻पोस्ट ग्रॅज्युएट लोकं भाजी विकण्यापासून ते डबे करून देण्यापर्यंत मिळेल ते काम करत आहेत (या व्यवसायांना कोणत्याही परिस्थितीत कमी लेखण्याचा उद्देश नाही).
आता लवकरच दिवाळी, मग ख्रिसमस आणि नवीन वर्षाची चाहूल लागेल. सर्वात जास्त खरेदीचे दिवस.
या पोस्टच्या सगळ्या वाचकांना माझी नम्र विनंती आहे.
मोठमोठ्या इंटरनॅशनल साईट्स वर जाऊन ब्रँडेड कपडे घेऊन तो पैसा बाहेर पाठवण्यापेक्षा मोठ्या कष्टाने उभे रहायचा प्रयत्न करणाऱ्या संसारांना हातभार लावू.
प्रत्येकाला वेगळे डोनेशन देणे शक्य होत नाही.
पण जे काही खरेदी कराल ते ओळखीपाळखीतल्या
कष्टकरी मित्रमैत्रिणींकडून घ्या.
आजकाल आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या आणि अनेक फेसबुक ग्रुपमध्ये आहोत. व्यवसायिक ग्रुप पण आहेत. कोण काय काम करते आहे किंवा काय विकते आहे सहज कळू शकेल.
प्रत्येक वेळी वेगवेगळ्या व्यक्तींना संधी द्या.
देशी उत्पादनावर भर द्या.
थोडे सावध राहून घेत असलेल्या प्रॉडक्ट्सची माहिती घ्या.
आपल्याला एक दोन कुटुंबे नाही.🙏🏻सारा देश परत उभारायचा आहे.🙏🏻
सणवारांवर अनावश्यक खर्च करण्यापेक्षा एखाद्या कुटुंबात दिवाळीचा दिवा लागेल का ते पहा.
वेळ वैऱ्याची आहे.🤚🏻 मात्र शांत रहा🙏🏻