Showing posts with label From Krishna Mahajan. Show all posts
Showing posts with label From Krishna Mahajan. Show all posts

Friday, October 9, 2020

किंमती रत्नांची भेट

आज अधिक मासाचा उत्तरार्ध सुरू होत आहे. त्यानिमित्त आपणांसर्वांना  सात किंमती रत्नांची भेट पाठवित आहे.
 *🍁💥   पहिले रत्न    💥🍁*
  💫  *माफी*  💫
तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलले, तरी ते मनाला लावून न घेता, मोठ्या मनाने 'माफ' करा.
*🍀💥 दुसरे रत्न  💥🍀*
  💫  *उपकार*  💫
दुसऱ्यावर केलेले उपकार विसरा. फळाची अपेक्षा करु नका. 'निःस्वार्थ' भावना ठेवा.
*‼️🎄तिसरे रत्न 🎄‼️*
  💫  *विश्वास*  💫
 नेहमी 'स्वकष्ट' आणि कर्मावर' अतूट विश्वास ठेवा.  हीच तुमच्या यशाची पावती असेल.
*💥  चौथे रत्न*   💥
 💫  *नातं*  💫
समोरच्याच्या मनाची काळजी आपण आपल्या मनापेक्षा जास्त घेतल्यावर जे निर्माण होत ते नातं. त्या नात्याला जपा, नात्यांना तडा जावू देवू नका.
*💥  पाचवे रत्न*   💥
💫  *दान*  💫
नेहमी चांगल्या कार्यासाठी सढळ हाताने दान करा. दान केल्याने धन कमी होत नाही, उलट दान केल्याने मान व समाधान मिळते. आपले मनच आपल्याला दानशूर ही पदवी बहाल करतं.
 *💥  सहावे रत्न*   💥
  💫  *आरोग्य*  💫
दररोज व्यायाम करा, योगासने करा,चालणे ठेवा आणि आपले जीवन निरोगी ठेवा.
*💥   सातवे रत्न*   💥
  💫   *वैराग्य*  💫
नेहमी लक्षात ठेवा की, 'जन्म' आणि 'मरण' कधीच कुणालाच चुकलेले नाही. 'जन्म'  घेतला म्हणजे  'मृत्यु' अटळ आहे.  वर्तमानात जगा. कोणत्याही गोष्टींचे दुःख कुरवाळत  बसू  नका. 

*'एकंदरीत जीवन खूप सुंदर आहे,  आनंदाने जगा..*.🌸🙏🏻🌸  🌹
*माणूस जसा बदलत चालला आहे, तसा निसर्ग देखील बदलत चालला आहे.*
*निसर्गाची ताकद किती आहे बघा. निसर्गातील एक विषाणू सांगून गेला, पैसा,संपत्ती,गाडी,बंगला,सोने, श्रीमंती याही पेक्षा आपला जीव महत्त्वाचा आहे.* 🌻
 🌹👏🏽🌹👏🏽🌹👏🏽🌹