Wednesday, September 16, 2020

Ishwar Mahajan

अनुसूचित जातीमधील पोटजातींचे विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन 
अमळनेर ः तालुक्यातील अनुसूचित जातीमधील भंगी, मेहतर, वाल्मिकी, डोम, डुमार, हलालखोर, सुदर्शन, लालबेगी, मलखाना, ओलगाना, रुखी, कोरार, झाडमली, हेला, समाजाला पाच टक्के आरक्षणासह विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार मिलींदकुमार वाघ यांना देण्यात आले. 
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,  राज्यात महर्षि वाल्मीकी आर्थिक विकास महामंउळ निर्माण करण्यात यावे, लाड पागे समितीच्या सर्व शिफारसी लागू करण्यात याव्या, सफाई कर्मचारी आयोगाला संविधानिक दर्जा देण्यात सावा, राज्यात बार्टी आणि सारथी प्रमाणे निर्माण करण्यात यावे. मेहतर, वाल्मिकी समाजाला राखीव जागा ठेवण्यात यावी, शिक्षक मतदार संघ, पदवीधर मतदार संघ यासारख्े महारष्ट्रातील प्रत्येक विभागात सफाई कम्रचारी मतदारसंघ निर्माण करण्यात यावा राज्यामध्ये सर्व नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका तथा जिल्हा परिषद मध्ये सफाई कर्मचारी प्रतिनिधी स्विकृत
सदस्य म्हणून या समाजाील व्यक्तीला घेण्यात यावे, बेरोजगाराच्या नावावर दोन एकर जागा उद्योगासाठी देण्यात यावी कार्यालयामध्ये सफाई कर्मचारी आयोगाचे वेगळे कार्यालय असावे अशा विविध मागण्या समाजातर्फे करण्यात आल्या आहेत. निवेदनावर संदीप धाप,नरेश घोगले,आकाश कलोसे, उमेश कलोसे, अजय धाप,आदर्श लोहेरे, गोलू लोहेरे,महेश सोत्रे आदीसमाज बांधवांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

No comments:

Post a Comment